“डिजिटल शिक्षणाची साथ, विद्यार्थ्यांच्या प्रगतीची नवी वाट!”
विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक आनंददायी, प्रभावी व आधुनिक व्हावे, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टेंड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, संगमनेर येथे ७५ इंची स्मार्ट डिजिटल बोर्ड प्रदान करण्यात आला.
शनिवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टेंड चॅरिटेबल ट्रस्टचे प्रेसिडेंट अनिरुद्ध बोकील , तसेच नितीन वाशिकर, संदीप देवधर, आदित्य देवधर यांनी शाळेस सदिच्छा भेट दिली.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
आधुनिक युगातील शिक्षणामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्त्व व स्मार्ट डिजिटल बोर्डची गरज याबाबत मान्यवरांशी चर्चा करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा मान्यवरांनी थोडक्यात आढावा घेतला.
शाळेच्या विविध शैक्षणिक व नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देणारा व्हिडिओ स्मार्ट बोर्डवर दाखविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी डिजिटल बोर्डचा प्रभावी व सातत्यपूर्ण वापर करावा, असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले.शाळेच्या वतीने रोटरी क्लबच्या सर्व मान्यवरांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश गाढवे, उपाध्यक्ष शिवाजी बांदल, अंगणवाडी सेविका बांदल मॅडम, देशमुख मॅडम,. सीमा धुमाळ तसेच शाळेतील शिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा हा उपक्रम शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीस निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
“डिजिटल शिक्षणाची साथ, विद्यार्थ्यांच्या प्रगतीची नवी वाट!”

