कापूरहोळ
भोर तालुक्यात राजकीय उलथा पालथ होत आहे. राजकीय समीकरण बदलत आहे.भोर तालुक्यातील कापूरहोळ गावचे रहिवासी राहुल गाडे यांनी आज अधिकृतपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये कार्यरत होते.
काँग्रेस पक्षाची धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठीची भूमिका हीच आपल्याला प्रेरणादायी वाटल्याचे राहुल गाडे यांनी सांगितले. स्थानिक विकास, शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त करत, काँग्रेसच्या माध्यमातून भोर तालुक्याच्या विकासासाठी सक्रिय योगदान देणार आहे. काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे यावेळी जाहीर केले.
या प्रवेशप्रसंगी भोर तालुका काँग्रेस अध्यक्ष सतीश चव्हाण तसेच कामथडी-भोंगवली गटाचे उमेदवार वैभव धाडवे उपस्थित होते. . या प्रवेशामुळे कापूरहोळ परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

