भोर तालुका वनखाते कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न

Rajtorannews
कापूरहोळ 

 भोर तालुका वनखाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा गोवर्धन मंगल कार्यालय, संगमनेर, ता. भोर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी वनविभागातील अधिकारी, संचालक मंडळ तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेसाठी अनिल लांडगे, वनक्षेत्रपाल राजगड-वेल्हे, शिवाजी राऊत, वनक्षेत्रपाल भोर आणि  गोविंद लंगुटे, वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण भोर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष रविंद्रनाथ गोते, संचालक गणेश पवार, नवनाथ पगडे, पंडित गायकवाड, भगवान तांबे, पांडुरंग गुट्टे, मनोज तारू, सारिका भैलुमे, यमुना गायकवाड यांच्यासह सभासद संचालक  उपस्थित होते.

सभेची सुरुवात निसर्ग कवी . लक्ष्मण शिंदे लिखित ‘झाडाची आरती’ सादर करून करण्यात आली. यानंतर रुद्राक्ष वृक्षाची विधिवत पूजा करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गोवर्धन मंगल कार्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
संस्थेचे संचालक  अरुण डाळ यांनी उपस्थितांचे स्वागत करून सभेची प्रस्तावना केली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संस्थेचे सचिव  लक्ष्मण शिंदे यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल वाचून मागील वर्षातील संस्थेच्या कामकाजाची सविस्तर माहिती सभासदांना दिली. संचालक मंडळाने निश्चित केलेला ८ टक्के लाभांश  जाहीर करून वाटप करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश, गुणवंत पाल्यांचा सन्मान आणि संस्थेच्या प्रगतीचा आढावा अशा विविध उपक्रमांनी ही वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
To Top