कापूरहोळ
१०८ रुग्णवाहिकेला कॉल करताच अवघ्या दहा मिनिटांत रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली.आणि एका महिलेची अवघ्या पाच मिनिटांत रुग्णवाहिकेतच डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूती प्रक्रिया पार पडली आणि अवघ्या पाच मिनिटांत बाळाचा सुरक्षित जन्म झाला.
सविस्तर माहिती अशी की माळवाडी (संगमनेर) ता भोर येथे गावोगावी फिरून लोहारकाम करणारे आकाश सुरेश चव्हाण व माधुरी आकाश चव्हाण हे दामपत्य गेली तीनचार दिवस माळवाडी येथे दाखल झाले होते. शेतीसाठी लागणारी वेगवेळी अवजारे बनवण्याचा व्यवसाय करत होते. दि. 21 रोजी दिवसभर कामाचा निपटारा झाल्यावर रात्री साडेबाराच्या सुमारास माधुरी आकाश चव्हाण या गर्भवती महिलेच्या पोटात अचानक दुखू लागले. म्हणून 108 या ऍम्ब्युलन्स सेवेला फोन केला अवघ्या दहा मिनिटांत रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली.प्रसंगावधान राखत गावातील मुख्य मार्गांवरच वैद्यकीय तंत्रज्ञ यांनी रुग्णवाहिकेतच प्रसूती प्रक्रिया पार पडली आणि अवघ्या पाच मिनिटांत बाळाचा सुरक्षित जन्म झाला. या प्रसंगी रुग्णवाहिकेचे चालक सुभाष हळे तसेच आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ डॉक्टर मिलींद कांबळे यांनी तत्परता दाखवत महिलेची सुरक्षित सुखरूप प्रसूती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
त्यानंतर आई व बाळाला पुढील उपचारासाठी भोर येथील सरकारी रामबाग रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती सध्या ठणठणीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या घटनेमुळे १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेच्या तत्परतेचे पुन्हा एकदा उदाहरण पाहायला मिळाले असून या सेवेचा लाभ गोरगरीब जनतेला मिळत आहे. 108 वरील संपुर्ण स्टापचे परिसरातून कौतुक होत आहे.

