कापूरहोळ
शिक्षण हक्क कायदा अर्थात Right of Children to Free and Compulsory Education Act अंतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आज, १७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाली आहे. पालकांना १० मार्चपर्यंत अर्ज करता येणार असून, वेळेत अर्ज न भरल्यास संधी कायमची हुकण्याची शक्यता आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील ८,६५० शाळांची नोंदणी झाली असून तब्बल १,१२,७०६ जागा उपलब्ध आहेत. यापैकी ९०५ शाळांमध्ये १७,५०९ जागा RTEसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षणाची सुवर्णसंधी मिळणार आहे.
⚠️ नियम मोडला तर अर्ज बाद!
अफरातफर टाळण्यासाठी शिक्षण विभागाने कडक सूचना जारी केल्या आहेत:
पोर्टलवर निवासस्थानापासून १ किमी अंतरावरील शाळाच दिसणार
एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास सर्व अर्ज बाद
किमान १० शाळांची निवड बंधनकारक
मेसेजवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत पोर्टलवरील सूचनांचे पालन
चुकीची माहिती दिल्यास प्रवेश तत्काळ रद्द
निवासस्थान नमूद करणे अनिवार्य
सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड सक्तीचे
📑 आवश्यक कागदपत्रे
आई-वडिलांचे आधार कार्ड
बालकाचे जन्मप्रमाणपत्र
वास्तव्यासाठी नोंदणीकृत भाडेकरार / पत्ता पुरावा
जाती / अपंगत्व दाखला (परराज्यातील दाखला अमान्य)
वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचा दाखला
शिक्षणाच्या हक्कासाठी शासनाने दिलेली ही मोठी संधी आहे. निष्काळजीपणा, अफवा किंवा दलालांच्या भूलथापांना बळी पडू नका. वेळेत अर्ज भरा, अन्यथा प्रवेशाची सुवर्णसंधी हातातून निसटेल!

