वेळू–नसरापूर -भोंगवली -कामथडी गटात शांततेत मतदान उमेदवारांचे नशीब बंद पेटीत, सोमवारी निकाल

Rajtorannews
कापूरहोळ 
वेळू–नसरापूर, भोंगवली - कामथडी, भोलावडे- शिंद, उत्रौली - कारी  जिल्हा परिषद व पंचायत समिती गटांसाठी आज दि. 7 रोजी मतदान शांततेत पार पडले. कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता सर्व उमेदवारांचे नशीब मतदान पेटीत बंद झाले आहे.
जिल्हा परिषद गट क्रमांक ५६ ते ५९ आणि पंचायत समिती गण क्रमांक १११ ते ११८ या सर्व गटांत भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे), शिवसेना (उबाठा), वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. अनेक गटांत स्थानिक पातळीवरील प्रतिष्ठेची लढाई रंगली असून काही ठिकाणी मताधिक्य अत्यल्प राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे, काही गटांत त्याच कुटुंबातील किंवा परिचित उमेदवारांमध्ये थेट सामना, तर काही ठिकाणी महिला उमेदवारांची निर्णायक भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. ग्रामीण भागात शेती, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व विकासकामे हे मुद्दे मतदारांवर प्रभाव टाकताना दिसले.
मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.
कोण मारणार बाजी?
कोणाचा बालेकिल्ला ढासळणार?
तर कोण नव्या ताकदीने उभा राहणार?
उत्कंठा शिगेला पोहोचली असून अंतिम उत्तर सोमवारी मतपेटीतून बाहेर येणार आहे
To Top