भोर–राजगडमध्ये मतदानाचा उच्चांक! भोर 75.62% तर राजगड 79.30% मतदान – लोकशाहीचा जल्लोष

Rajtorannews
कापूरहोळ

भोर व राजगड तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदारांनी विक्रमी मतदान करत प्रशासनासह राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. भोर तालुक्यात 75.62 टक्के, तर राजगड तालुक्यात 79.30 टक्के इतके भरघोस मतदान झाले.

सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ग्रामीण भागातील मतदारांनी शेतीकाम व रोजंदारी बाजूला ठेवत मतदानासाठी प्राधान्य दिले.
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस व निवडणूक यंत्रणेच्या सतर्कतेमुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

भरघोस मतदानामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून आता 9 फेब्रुवारीच्या मतमोजणीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
To Top