जुने विरुद्ध नवे : निवडणूक रिंगण तापले प्रचार शिगेला; घड्याळाची टिकटिक वाढली भोलावडे - शिंद गटात प्रवीण जगदाळेंना मतदारांची पहिली पसंती

Rajtorannews
भोर

भोर तालुक्यातील वेळवंड, राजगड आणि हिरडस मावळ खोऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रवीण बाळासाहेब जगदाळे अखंडपणे कार्यरत आहेत. दूरदृष्टी, प्रभावी कार्यकर्तृत्व आणि मजबूत जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी या संपूर्ण परिसराला विकासाच्या नव्या वाटा दाखवल्या असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सामाजिक उपक्रम, बैलगाडा शर्यती तसेच आपत्तीग्रस्तांना मदत कार्य अशा विविध क्षेत्रांत त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. सर्व घटकांना सोबत घेऊन एकात्मता आणि प्रगतीचा संदेश देत वेळवंड खोऱ्याला नवी दिशा देण्याचे काम त्यांनी निस्वार्थपणे पार पाडले असल्याची भावना स्थानिकांतून व्यक्त होत आहे.

भोर–राजगड–मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ मांडेकर आणि रणजितदादा शिवतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षबांधणी, युवा संघटन आणि पक्षाचे ध्येय–धोरण जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने व प्रामाणिकपणे सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.

दरम्यान, ऐतिहासिक ‘येसाजी कंक जलाशय’ हा परिसराच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाची साक्ष देणारा अमूल्य ठेवा मानला जातो. या अद्वितीय जलाशयाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पर्यटन वाढीसाठी प्रयत्न सुरू असून त्यातून रोजगार निर्मिती होणार असल्याने विकासाच्या मुद्द्यांना आणखी बळ मिळणार आहे.

निवडणूक प्रचार आता शिगेला पोहोचला असून ‘जुने विरुद्ध नवे’ अशी स्पष्ट लढत रंगत आहे. मात्र, विकासकामांचा चढता आलेख आणि सातत्यपूर्ण संपर्क यामुळे मतदारांमध्ये प्रवीण जगदाळे यांच्याबद्दल सकारात्मक कल वाढत असल्याचे चित्र दिसत असून भोलावडे शिंद गटात राष्ट्रवादीचे पारडे जड दिसत असून  जगदाळे विजयी होणारच असा ठाम विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.
To Top