कापूरहोळ
सुनेत्राताई पवार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 रोजी महाराष्ट्रातील धाराशिव (पूर्वीचा उस्मानाबाद) येथे एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बाजीराव पाटील आहे आणि त्यांच्या भावाचे नाव पद्मसिंह पाटील, जे एक प्रभावी राजकीय नेते होते.
जन्मजात राजकीय संस्कृतीचा वारसा असल्यामुळे सामाजिक आणि सार्वजनिक कामांनी त्यांचे बालपण प्रभावित झाले होते.
सुनेत्रा पवार यांनी साहित्य व वाणिज्य शाखेतून ऑरंगाबादमधील SB Arts and Commerce College येथून बी.कॉम (Bachelor of Commerce) 1983 मध्येपदवी प्राप्त केली.डिसेंबर 1985 मध्ये त्यांनी अजीतदादा पवार यांच्याशी विवाह केला, जे पुढे महाराष्ट्राचे सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले.
विवाहानंतर सुनेत्रा पवार यांनी मुख्यतः कौटुंबिक व सामाजिक कामांना विशेष प्राधान्य दिले. राजकारणापासून दूर असतानाही सुनेत्रा पवार यांनी सामाजिक कामात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. Environmental Forum of India (EFOI) नावाची स्वयंसेवी संस्था त्यांनी 2010 मध्ये स्थापना केली, जी ग्रामीण भागात पर्यावरण जागृती व शाश्वत विकासासाठी काम करते.
बारामतीच्या काटेवाडी गावाला “इको-व्हिलेज” बनवण्यास विशेष पुढाकार दिला — येथे सौर विज, बायोगॅस, शून्य कचरा नियम योजना यांसारख्या प्रतिपादनांनी गावातील जीवनमान बदलले.महिला सक्ष्मी करणासाठी Baramati Hi-Tech Textile Park या कंपनीची स्थापना केली.अध्यक्षपदावरून ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला, जिथे कोल्हापूर व आसपासच्या भागातील सुमारे 15,000 महिलांना रोजगार दिला.
शिक्षण व समाजकार्य करताना Vidya Pratishthan या शैक्षणिक संस्थेच्या न्यासपदावरून लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षण व सामाजिक विकासात त्यांचा हातभार होता. सुनेत्रा पवार यांनी जरी अनेक वर्ष सामाजिक कार्यात व्यतीत केले.
राजकारणात सक्रीय प्रवेश
2024 मध्ये Baramati मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रथम भाग घेतला आणि सुप्रिया सुळे (राजकीय नातिवाई आणि विरोधी उमेदवार) यांच्याशी मुकाबला केला, परंतु त्यांना निवडणूक जिंकता आली नाही. लोकसभा पराभवानंतरही NCP पक्षाच्या तर्फे राज्यसभा सदस्य म्हणून त्यांना संधी मिळाली, ज्यामुळे त्या संसद सदस्य झाल्या.
महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री
28 जानेवारी 2026 रोजी अजीतदादा पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झाले. नंतर 31 जानेवारी 2026 रोजी, सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, आणि राज्याचा इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद झाली. शपथविधी प्रसंगी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.त्यांनी मद्यव्यवस्थापन, क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास या खात्यांचे नेतृत्व स्वीकारले.
"शपथ घेतल्यानंतर त्यांनी अजीत पवार यांचे राजकीय व सामाजिक कार्य पुढे नेण्याचे जनतेला वचन दिले व भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली "
सुनेत्राताई पवार यांचा प्रवास सामाजिक कार्यापासून राजकीय नेतृत्वापर्यंतचा प्रेरणादायी आहे ज्यात त्यांनी पर्यावरण, महिला सक्षमीकरण, सामाजिक विकास अशा सार्वजनिक जबाबदाऱ्या समर्थ पणे पार पाडल्या आहेत.

