अमृतेश्वराचा महाशिवरात्रीचा उत्सव मोठया थाटांत व उत्साहात संपन्न

Rajtorannews
कापूरहोळ 
कैलासराणा शिव चंद्रमौळी
फणींद्र माथा मुकूटी झळाळी
 कारुण्यसिंधू भवदुःखहारी
 तुजविण शंभो मज कोण तारी
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात प्राचीन शिवमंदिरांची एक शृखंलाच आहे. रायरेश्वरचा रायरेश्वर, भोरचा भोरेश्वर, आंबवडेचा नागनाथ/ नागेश्वर, भांबटमाळचा शंभू महादेव, नसरापूरचा बनेश्वर व मोहरीचा अमृतेश्वर ही भाविकांची श्रद्धास्थाने असून भक्तांना आत्मिक समाधान देणारी शक्तीपीठे आहेत. ऐतिहासिक गुंजन मावळातील किल्ले राजगड मधून उगम पावणा-या गुंजवणी नदीच्या तीरावर वसलेले मोहरी हे गाव. अमृतेश्वरच्या पौराहित्याची जबाबदारी वंशपरंपरेने शिवकाळापासून सांभाळणारे राजगुरु हे राजगड किल्ल्यावरील पद्मावती मातेच्या पुजेचे देखील सेवेकरी आहेत.
 पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मोहरीचे अमृतेश्वर चे महत्त्वही तितकेच आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मोहरी ता भोर येथे वसलेल्या या मंदिरात महाशिवरात्रीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते येथील अमृतेश्वराचे मंदिर प्राचीन असून संपूर्ण दगडी कोरीव कामा बरोबरच त्याला ऐतिहासिक महत्व आहे या वर्षी मंदीराला नयनरम्य विदयुत रोषनाई करण्यात आली होती. शिवहरर सांब सदाशिव हररे या भजनाने मंदीराचा परिसर तारस्वराने रात्रंदिवस दुमदुमुन गेला होता. मोहरीचे अमृतेश्वर मंदीरातील महाशिवरात्रौत्सवाला चारशे वर्षा पूर्वीची परंपरा असून श्री अमृतेश्वराचे दर्शन
घेण्यासाठी देशातील विविध कानाकोप-यातून भाविक भक्त आले होते. मंदीरात भजन पूजन अभिषेक एकादशणी लघुरूद ,महारूद्र ,छबीना कथा कीर्तन ,प्रवचन तसेच मंदीरा भोवताली पालखी मिरवणूक असे विविध कार्यक्रम करण्यात आले तसेच महाप्रसाद होम हवन असे कार्यक्रम महाशिवरात्रीच्या दिवसा पर्यंत चालू होते.
अमृतेश्वराचे मंदीराचे ठिकाण पुणे जिल्हयातील भोर तालुक्याल मौजे मोहरी येथे असून हे ठिकाण पुणे भोर मार्गावर कासुर्डी फाट्यावरून हातवे तांभाड रस्त्यावर आहे. श्री अमृतेश्वर हे स्वयंभू शिवशंकराचे जागृत देवस्थान पुराणकालीन प्रसिद्ध असून ते शिवगंगा गुंजवणी आणि महादेवाचा ओढा असा त्रिवेणी संगम जेथे होतो तेथे हे ठिकाण असून या मंदीराला लागून दगडी बांधकामातील दोन पाण्याची बाराही महीने पाणी न आटणारी दोन कुंडे आहेत त्यातील पाणी स्वच्छ व आयुर्वेद दृष्टया औषधी मानले जाते. मंदीराचे बांधकाम पुर्ण दगडी असून सभा मंडप व पिंडीचा गाभारा असून कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदीरातील दगडी मंडपा प्रमाणे दगडी खांबावर हा मंडप उभारलेला असून पांडव कालीन मंदीरा प्रमाणे या मंदीराची बांधणी करण्यात आलेली आहे. या मंदीरांच्या बांधकामातील दगडींवर विविध चित्रे कोरलेली आहेत.
या देवस्थाना बाबत अनेक आख्यायिका प्रसिद्ध असून पंचकोशीतील जुनी जानती वृद्ध माणसेही अद्याप ती सांगतात या मध्ये इ.स. ३० मे १६३९ चा दादोजी कोंडदेव यांनी बाबाजी नेर्लेकर आणि जनाजी खैरे यांचा कोढित ता पुरंदर येथील मुकादमकीचा वाद सोडवताना बारा मावळातील देशमुख व दादोजी कोंडदेव यांच्या समक्ष उकळत्या तेलातून सोन्याचा गोळा हाताने काढण्याचे दिव्य जनाजी खैरे यांनी करून खरे खोट्यात खरे उतरने अशा अनेक कथा प्रसिध्द असून हे देवालय जागृत असल्याचे सांगीतले जाते. या देवालयाचे आणखी एक वैशीष्ट म्हणजे या मध्ये साळुंका नसलेले सदासर्वदा पाणी असलेले असे वैशिष्टयपूर्ण अव्दितीय असे है शिवलिंग आहे. देवळांतील गाभा-यात शिवलिंगाच्या मागील कोनाडयात "गरुडासह लक्ष्मी विष्णु कोरीव मूर्ती आहे. मंदीरावर गाय बैल कमळ वाघ हत्ती व गंड भेरुड एक धड दोन डोकी व एक पोट असणारा पायात वाघ पकडलेला गरूडासारखा दिसणारा सुरेख काल्पनिक प्राणी शक्तीचे प्रतीक असणारे हे एक शुभचिन्ह कोरलेले आहे. मंदीराच्या दारात डावीकडे उंच दगडी दिपमाळ असून ती महाशिवरात्र त्रिपुरी पौर्णिमा व चैत्री पाडव्याला असंख्य पणत्यांनी हा सारा परिसर उजळून टाकला जातो. शिळीमकर देशमुखाचे श्री अमृतेश्वर कुलदैवत आहे. याच शिळीमकरांनी स्वराज्याचे कामी अनेक अतुलपराक्रम केल्याने या देवाच्या पालखीला खांदेक-याचा त्यांचा मान आहे. यांच देवालयाला छत्रपती शिवाजी राजे , संभाजी राजे , दादोजी कोंडदेव श्री शाहू महाराज यांनी दर्शन घेवून आशिर्वाद घेतल्याच्या नोंदी इतिहासात आहेत. या राजांच्या देणगीतून या ठिकाणी वाई येथील वैदय यांस सन १७४२ साली या देवालयाच्या पुजेची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा पासून ते आज पर्यंत ते देवाची सेवा करतात.
या ठिकाणी पुर्वी दहा दिवस महाशिवरात्री उत्सव चालत होता असे वयस्कर जानकार सांगतात तो उत्सव सध्या तीन दिवसावर आला आहे. महाशिवरात्र उत्सवासाठी पुणे मुंबई हैद्राबाद सातारा सांगली वाई व भोर तालुक्यातील मोहरी पंचक्रोशीतून मोठया संख्येने भावीक भक्त हजर रहात असतो तर शिळीमकर वैदय इत्यादी घराण्यातील मंडळी नोकरी व्यवसाया निमीत्ताने जरी बाहेर गेली असली तरी राज्यातील परराज्यातील मंडळी सातासमुद्रापार पासून या कार्यक्रमासाठी दहा दिवस हजर रहातात हे विशेष. असा हा श्री अमृतेश्वराचा अमृतमयी अमृतोत्सव महाशिवरात्रीला साजरा करण्यात येतो.

To Top