कापूरहोळ
विकास हवा, रस्ते हवे, नोकऱ्या हव्यात — पण मतदानाला जायचं नाही, हे चालणार नाही. लोकशाहीत १८ वर्षे पूर्ण होताच मिळणारा मतदानाचा अधिकार ही केवळ सोय नसून भविष्यासाठीची थेट ताकद आहे, आणि त्या ताकदीकडे दुर्लक्ष करणारेच सिस्टीमला दोष देतात.
रस्त्यांवरील खड्डे, बेरोजगारी, शिक्षणाचा दर्जा, भ्रष्टाचार यावर ओरड करणारे अनेकजण मतदानाच्या दिवशी मात्र घरी बसतात. हीच उदासीनता चुकीचं नेतृत्व जन्माला घालते आणि त्याची किंमत संपूर्ण समाजाला मोजावी लागते.
मतदान करताना भावनिक, जातीय किंवा धार्मिक प्रलोभनांना बळी न पडता केवळ विकास, पारदर्शकता आणि भविष्यातील संधी यांचा विचार गरजेचे आहे. तरुणांच्या हाताला काम देणारे, जनतेच्या प्रश्नांना सामोरे जाणारे असे जबाबदार नेतृत्व हवे असेल तर मतदान करा.
“सोशल मीडियावर पोस्ट टाकून क्रांती होत नाही. खरी क्रांती मतदान केंद्रावर बटण दाबल्यानंतरच होते.शेवटी, “मतदान हे कर्तव्य नाही, तर ती आपली जबाबदारी आहे." जो मतदान करत नाही, त्याला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही,” म्हणून नागरिकांनी जबाबदारीने मतदान करून नेतृत्वाची निवड करावी.

