86 वर्षांच्या आजोबांचा लोकशाहीवर विश्वास; 57 वेळा केले मतदान

Rajtorannews

कापूरहोळ 
संगमनेर-माळवाडी (ता. भोर) येथील खंडू परशुराम शिंदे या 86 वर्षांच्या आजोबांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भोंगवली कामथडी गटातून आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीवरील आपला दृढ विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समिती, ग्रामपंचायत या झालेल्या निवडणुकीत मतदान केले आहे.विशेष बाब म्हणजे आजवर त्यांनी तब्बल 57 वेळा मतदान केले असून, वयाच्या या टप्प्यावरही त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावला.

लोकशाही बळकट होण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान केलेच पाहिजे, असा संदेश यावेळी त्यांनी दिला. “मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून तो बजावणे हे आपले कर्तव्य आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
उत्फूर्त मतदानामुळे तरुण पिढीसह सर्व मतदार नागरिकांना आदर्श घालून दिला , त्यांचा उत्साह आणि लोकशाहीप्रती असलेली निष्ठा कौतुकास्पद आहे.
To Top