भाजपच्या उमेदवाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसादवेळू–नसरापूर गटात विरोधकांची धावपळ

Rajtorannews
कापूरहोळ 
भोर तालुक्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या वेळू–नसरापूर जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार तथा ‘शिक्षण सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे पोपट सुके यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वेग येताना दिसत असून, विरोधी गटांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

गेल्या आठवडाभरात पोपट सुके यांनी मतदारसंघातील विविध गावांमध्ये जाहीर सभा, घरभेटी आणि संवाद मेळावे घेतले. या प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून पाठिंबा दर्शविला.
शनिवारी वर्वे येथील मंगल कार्यालयात झालेल्या जाहीर सभेला शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. महिला, युवक, शेतकरी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला. शिक्षण क्षेत्रातील भरीव कामामुळे ‘शिक्षण सम्राट’ अशी ओळख असलेला उमेदवार वेळू–नसरापूर गटाला लाभल्याने मतदारांमध्ये विशेष उत्साह आहे.
यावेळी शाळा-महाविद्यालयांसाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वाढवणे, ग्रामीण भागात डिजिटल शिक्षण केंद्रे उभारणे आणि शिक्षणाचा दर्जा उंचावणे या मुद्द्यांवर मतदारांमध्ये सकारात्मक चर्चा रंगली.

“वेळू–नसरापूर गटात पहिल्यांदाच शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणारा उमेदवार मिळत आहे. त्यामुळे आम्ही पोपट सुके यांना पूर्ण पाठिंबा देणार आहोत,” अशी ठाम भूमिका मतदार व्यक्त करत आहेत.

राजकीय जाणकारांच्या मते, सध्याचा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत पोपट सुके यांचे पारडे जड मानले जात आहे
To Top