निवडणुका जाहीर होताच तालुक्यात राजकीय भूकंपाचे संकेत!

Rajtorannews
कापूरहोळ 
संभाव्य उमेदवारांची चाचपणी, पक्षांतरासाठी गुप्त हालचालींना वेग
तालुक्यात निवडणुकांची घोषणा होताच राजकीय वातावरण ढवळून निघाले असून आगामी राजकीय भूकंपाची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. संभाव्य उमेदवारांनी मतदारसंघात जोरदार चाचपणी सुरू केली असून बैठका, संपर्क दौरे आणि शक्ती प्रदर्शनाला उधाण आले आहे.
पक्षांतर्गत तिकीट मिळण्याबाबत साशंक असलेले अनेक उमेदवार पर्यायी मार्गांच्या शोधात असून पक्षांतरासाठी गुप्त मोर्चेबांधणी सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. काही ठिकाणी वरिष्ठ नेत्यांशी बंद दरवाजामागे बैठका तर काही ठिकाणी बाहेरील पक्षांशी साटेलोटे सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, तालुक्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून आज मित्र असलेले उद्या प्रतिस्पर्धी तर आजचे विरोधक उद्या एका व्यासपीठावर दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काही दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याने मतदारांचे लक्ष या हालचालींकडे लागले आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीत कोण कोणत्या पक्षात जाणार, कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, यावर तालुक्याचे राजकारण अवलंबून राहणार असून पुढील दोन ते तीन दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.
To Top