जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला, प्रचारासाठी केवळ सात दिवस कापूरहोळ

Rajtorannews
कापूरहोळ 

पुणे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर झाल्या असून उमेदवार केवळ सातच दिवस प्रचार करू शकणार आहेत.त्यामुळे ग्रामीण भागात उमेदवाराची पूर्ती दमछाक होणार आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
उमेदवार अर्ज दाखल करण्यास सुरुवात 16 जानेवारी 2026 होणार आहे. तर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2026 असेल.अर्जाची छाननी 22 जानेवारी 2026 रोजी असेल.अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2026 तर चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.30 नंतर होणार आहे.मतदान 05 फेब्रुवारी 2026 रोजी होऊन मतमोजणी व निकाल 07 फेब्रुवारी 2026 असणार आहे.

या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मतदान करावे लागणार आहे. एक मत गटासाठी म्हणजेच जिल्हा परिषद उमेदवाराला तर दुसरे मत गणसाठी पंचायत समितीच्या उमेदवाराला द्यावे लागणार आहे.
To Top