भोरमध्ये काँग्रेस–वंचितची युती जाहीर; जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले

Rajtorannews
कापूरहोळ

भोर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात अधिकृत आघाडी जाहीर करण्यात आली आहे. फुले–शाहू–आंबेडकर यांच्या विचारधारेवर ठाम असलेले दोन्ही पक्ष लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी एकत्र येत विजयाचा निर्धाराने निवडणूक लढवणार असल्याचा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला.

या आघाडीच्या घोषणेसाठी झालेल्या बैठकीस काँग्रेस भोर तालुका अध्यक्ष सतीश चव्हाण, पुणे जिल्हा युवा काँग्रेस प्रवक्ता सचिन खोपडे व शैलेश जाधव उपस्थित होते. भोंगवली–कामथडी जिल्हापरिषद गटातून वैभव धाडवे तर पंचायत समिती नसरापूर गणातून विजय शिळीमकर हे उमेदवार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष संतोष लोखंडे, उपाध्यक्ष सुनील कांबळे, महासचिव अरुण कांबळे, उपाध्यक्ष मयूर गायकवाड यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भोर तालुक्यात सामाजिक न्याय, विकास आणि लोकाभिमुख कारभारासाठी ही आघाडी निर्णायक ठरेल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.
To Top