कापूरहोळ
जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणुकीचे बिगुल वाजले असून भोलावडे-शिंद गटात वातावरण चांगलेच तापू लागले आहे. १६ ते २१ तारखेपर्यंत नामनिर्देशन अर्ज ऑफलाईन भरले जाणार असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये तिकीट मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे.
नवीन प्रभाग रचनेनुसार भोलावडे शिंद गट उदयास आला आहे. शिंद गणातुन सर्वसाधारण महिला आरक्षण आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून म्हसर येथील मनीषा संतोष कंक, भाजपाकडून आपटीतील मनिषा राहुल पारठे, रूपाली प्रवीण ढवळे, गवडीतील शिवसेना उबाठा कडुन वैशाली भरत साळुंके, राजीवडीतील अर्थना अरुण राजीवडे हे महिला उमेदवार इच्छुक आहेत.
भोलावडे गणात नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षण आहे. म्हाळवडीतुन सर्जेराव बोडके, राजेश बोडके तसेच करंदी बुद्रुक गणेश वरखडे, अनिल सावंत, काळूराम मळेकर, विठ्ठल वरखडे, किवतमधील अक्षय चव्हाण, बसरापूरमधून सूर्यकांत बदक, पांगरीतून गणेश कंक, कोंडगाव मधुन संदीप दूरकर, येवलीतून किरण खंडाळे, असे इच्छुक उमेदवार तयार रिंगणात आहेत.
जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण आरक्षण आहे. राष्ट्रवादी अजित पवार कडून भोलावडेतील विद्यमान सरपंच प्रवीण जगदाळे, कर्नवडीतील शंकर कडु, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस प्रा. बी डी गायकवाड, भाजपाकडून भोलावडेतील माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून पसुरे येथील मानसिंग धुमाळ, वंदना धुमाळ, महुडेतील रविंद्र बांदल तर शिवसेना शिंदे पक्षाकडून जयतपाड मधील सागर धुमाळ हे उमेदवार इच्छुक आहेत.तर काँग्रेस आय कडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही.
भोलावडे -शिंद जिल्हा परिषदेच्या गटात एकूण ७२ गावांचा समावेश आहे. भोलावडे गणात ३४ आणि शिंद गणात ३८ गावे आहेत. भौगोलिक दृष्ट्या हा गट जटील असून दुर्गम डोंगरी भागाचा समावेश आहे.प्रचारासाठी उमेदवारांची धावपळ होणार आहे.
भाजपा,काँग्रेस आय, उबाठा, शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व अजित पवार पक्ष उमेदवार यांची आपल्या पक्षश्रेष्ठींकडे तिकीट मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे राजकीय घडामोडीला वेग आला आहे.भोलावडे गटात पंच रंगी निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मातब्बर रिंगणात, राजकीय अस्तित्वाची लढाई
भोलावडे गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि गटनेते विठ्ठल आवळे. लोकनियुक्त विद्यमान सरपंच प्रवीण जगदाळे, पसुरेतील माजी पंचायत समिती उपसभापती मानसिंग धुमाळ,माजी जिल्हा परिषद सदस्या व महिला बालकल्याण विभाग माजी सभापती वंदना धुमाळ , तसेच शंकर कडू, हिरडस मावळातून अरुण मालुसरे, महुडे खोऱ्यातून बी .डी. गायकवाड, शिंदचे रामदास भोंडवे या सर्वांचा मोठा दांडगा जनसंपर्क असून , आर्थिक दृष्ट्या सक्षम, सामाजिक कार्य, लोकप्रियता, असलेले आहेत त्यामुळे होणारी निवडणूक ही राजकीय अस्तीत्वाची अटीतटीची होणार आहे. गटात तिकीट कोणाला मिळणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

