वेळू नसरापूर गटात शिंदेंच्या शिवसेनेला दे धक्काबाळासाहेब जायगुडे भाजपात, कमळाची ताकद वाढली

Rajtorannews
कापूरहोळ

शिंदे गटाचे नेते केळवडे गावचे माजी सरपंच बाळासाहेब जायगुडे यांनी कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राजगड साखर कारखान्यात जायगुडे यांनी कामगार युनियन मध्ये कामगारांचे नेतृत्व केले आहे तसेच सेनेत असताना केळवडे गावचे सरपंच म्हणून पाच वर्षे यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. ते केळवडे विविध कार्यकारी सोसायटी चे विद्यमान सदस्य आहेत.

वेळू-नसरापूर गटाचे भाजप नेते माजी जिल्हा परिषद सदस्य शिवनाना कोंडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार संग्राम थोपटे याच्या कामावर प्रभावित होऊन भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रसंगी युवा नेते आदित्य बोरगे, भोर बाजार समिती संचालक रणजीत आण्णा बोरगे युवा नेते सोपान कोंडे आदी उपस्थित होते.

जायगुडे याच्या भाजप प्रवेशामुळे वेळू नसरापूर जिल्हा परिषद गटात भाजपची राजकीय समीकरणे बदलली असून याचा सकारात्मक परिणाम आगामी निवडणुकीत दिसणार असल्याचे राजकीय जानकार बोलत आहे.
To Top