भोर शहराला पाणीपुरवठा करणारी मेन पाईपलाईन फुटली,लाखो लिटर पाणी वाया

Rajtorannews
कापूरहोळ 

कापूरहोळ भोर मार्गाचे रुंदी करणाचे काम भोलावडे हद्दीत सुरु आहे.ठेकेदार रस्त्याचे काम निष्काळजी पणे करत आहे. भोर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी ही रस्त्याचे खोदकाम करताना निष्काळजी पणे खोदकाम करत असल्यामुळे वारंवार फुटत आहे. यामधून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे. भोरला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून पाईपलाईन वारंवार फुटल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भोर नगर परिषद पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी सदर ठिकाणी दाखल झाले असून उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. ठेकेदार खोद काम करताना काळजी घेत नसल्याचे नागरिक बोलत आहेत.
To Top