कापूरहोळ
निवडणूकीचा बिगुल वाजत असल्यामुळे उमेव्दारांनी मतदारांची खातीरदारी व मनमिळवण्यासाठी नवेनवे फंडे काढून मतदारांना आकर्षित करण्याचा नेत्यांचा अटटास चालू आहे कतृत्व,समाजसेवा, समाजाप्रती आत्मीयता, गोरगरीबां बददल कळवळा,सहानुभूती ही मागील सात वर्षात दिसत नव्हती परंतू निवडणूकीचा बिगुल वाजण्याच्या आशेने याला उधाण आले आहे तर काही मतदारांचे लाडपुरवण्याचा धंनदांडग्यानी सपाटा लावला आहे.
मागील पावणेचार वर्षापासून निवडणूक लागेल या आशेने संभाव्य उमेव्दारांनी कंबर कसली असून मतदारांना आणि कार्यकर्त्याना खूष करण्यासाठी देवदर्शन किकेट सामने, खेळपैठणीचा, साड्या वाटप, लग्नकार्यास उपस्थिती,मागेल त्याला वर्गणी, गणपती व दुर्गा उत्सवात मंडळांना मुर्त्या वाटप करणे आदी उपक्रम राबवत मोठया प्रमाणात खर्च केला आहे. त्यामुळे संभाव्य उमेव्दार खर्च करून आर्थीक अडचणीत आले आहेत.आता निवडणुका तोंडावर आल्याने निवडणूकीतून काढता पाय घेता येईना झालेला खर्च वाया जाईल म्हणून उसणे अवसान आणून वैयक्तीक मालमत्ता विकून का होईना पण अधिकचा खर्च करीत आहेत.झालेला खर्च आणि संभाव्य खर्चाचे गणीत जुळवताना सर्वसामान्य उमेव्दार मात्र पुर्ते मेटाकुटीस आले आहेत. सहन होईना आणि सांगता येईना अशी अवस्था झाली आहे.
धनदांडग्या उमेव्दारांबरोबर निवडणूक लढविण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता मागे पडू लागला आहे. पक्षनिष्ठा ही केवळ नावापुर्ती राहीली असल्याची भावना कार्यकर्त्याची झाली असून आगामी निवडणूकीत पक्षांतर्गत वाद उफाळून येणार आहेत. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींना कार्यकर्त्याचे बंड थंड करण्यासाठी कौशल्य पणाला लावावे लागणार आहे असे जाणकारांचे मत आहे.
जवळपास चार वर्षे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका लांबल्यामुळे मतदारांना आणि कार्यकर्त्याना आपलेसे करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कार्यकर्ता नाराज होवू नये म्हणून नेत्यांकडून प्रत्येकाची मनधरणी सुरू आहे. योग्यवेळी निवडणूक झाली असती तर उमेव्दारांचा होणारा आवांतर खर्च थांबला असता.
चांदुभैय्या परदेशी, अध्यक्ष मैत्री प्रतिष्ठान.

