राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमात केला बदल. उमेदवारांना दोन दिवसाचा दिलासा

Rajtorannews
कापूरहोळ 

राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक  दोन दिवस पुढे ढकलत उमेदवारांना दिलासा दिला आहे. राज्य शासनाने तीन दिवस दुखवटा जाहीर केल्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचार थांबवला तसेच शासकीय कामकाज बंद असल्यामुळे निवडणुकीची यंत्रणा ठप्प झाली होती.
सर्वोच्च न्यायालयाने दि.१२/०१/२०२६ रोजी राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दि.३१/०१/२०२६ च्या पुढे २ आठवड्यांची मुदत वाढ दिली होती. त्यानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम चालू आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हा कार्यालयांनी दि.२७/०१/२०२६ रोजी उमेदवारी मागे घेणे आणि चिन्ह वाटपानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली.
मतदान, मतमोजणी व निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिध्द करणे हे निवडणूक टप्पे अद्याप बाकी आहेत. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे राज्य शासनाने दि.२८/०१/२०२६ रोजी राज्यात  दि.२८/०१/२०२६ ते दि.३०/०१/२०२६ याकाळात राज्य स्तरावरील दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना या कालावधीत प्रचार करणे शक्य नसल्याने प्रचाराच्या कलावधीत वाधन्यवाद करणे गरजेचे होते. त्यामुळे मतदान व मतमोजणी इ. निवडणूक टप्पे निश्चित केलेल्या दिनांकास पार पाडणे शक्य होणार नाही. म्हणून राज्य निवडणूक आयोगाने खालील प्रमाणे निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे.
त्यानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका सुधारीत कार्यक्रम-२०२६ 
१ जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीच्या सुधारित कार्यक्रमाची सुचना प्रसिध्द करण्याची तारीख – दि. ३१/०१/२०२६ (शनिवार)
२ मतदानाची सुधारित तारीख – दि.०७ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) (सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत)
३ मतमोजणी सुधारित तारीख – दि.०९ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) (सकाळी १०.०० पासून)
४ निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिध्द करणे
कार्यक्रमाचा दिनांक – दि.११ फेब्रुवारी २०२६ (बुधवार) असा राहील.
भोर तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांसाठी वरील सुधारित कार्यक्रम लागु असणार असल्याची माहिती भोरचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांनी दिली.
To Top