महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अनंतात विलीन

Rajtorannews
कापूरहोळ 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि प्रबळ राजकीय नेते अजित पवार यांचे विमान अपघातात आज दि 28 रोजी सकाळी 8.30 दरम्यान निधन झाले आहे. अपघात (चार्टर्ड विमान) बारामती विमानतळाच्या जवळ लँडिंग करत असताना क्रॅश झाले.विमान मुंबईहून बारामतीकडे जात होते, जिथे ते स्थानिक निवडणुका आणि सभांसाठी जाणार होते. यामध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात अजितदादा पवार उपमुख्यमंत्री,विदीप जाधव सुरक्षा कर्मचारी पिंकी माळी कृमेम्बर व सुमित कपूर आणि संभावी पाठक विमानाचे दोन चालक यांचा समावेश आहे.

मा. ना.  अजितदादा अनंतराव पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 चा असून त्यांनी सहकार चळवळीतून राजकारणात प्रवेश केला.1991 पासून बारामती विधानसभा मतदारसंघातून सलग आमदार आहेत. महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी आणि ताकदवान नेते म्हणून ओळखत होते.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री – सिंचन प्रकल्प, धरणे, पाणी व्यवस्थापनावर भर,ऊर्जा, नियोजन, ग्रामीण विकास खात्याचा कारभार समर्थ पणे पहिला आहे.कडक प्रशासक, थेट निर्णय घेणारे नेते,विकासाभिमुख राजकारण ग्रामीण महाराष्ट्र, शेतकरी, सहकार क्षेत्रावर विशेष लक्ष होते. 

“अजितदादा” म्हणून समर्थकांमध्ये लोकप्रिय नेता. दादा या शब्दाला आदर निर्माण करणारा नेता, वेळेला महत्व देणारा, वेळे आधी निघून गेला. महाराष्ट्रतील लाडक्या बहिणी व अख्या महाराष्ट्र दादांना पोरका झाला.
महाराष्ट्रच्या मातीत असा नेता पुन्हा होणे नाही.
To Top