कापूरहोळ
गेली अनेक वर्षे प्रतिकूल परिस्थितीत पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन कामकारणारे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये आता प्रचंड असंतोष पसरला आहे. निवडणुकीसाठी पक्षात आयुष्य वेचलेल्या जुन्या चेहऱ्यांना डावलून उमेदवारी दिल्याने पक्षात उभी फूट पडल्याचे चित्र आहे. "ज्यांनी वटवृक्ष लावला, त्यांच्याच बोकांडी फांद्या बसल्या," अशा शब्दांत जुन्या कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
भोंगवली कामथडी गटात राष्ट्रवादी मधील जुन्या फळीचा आरोप आहे की, ज्यांना उमेदवारी दिली त्यांच्या एकच घरात दोन तिकिटे दिली त्यामुळे पक्षाने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. ज्यांनी अंगावर गुलाल घेतला आणि पक्षासाठी रक्ताचे पाणी केले, त्यांनाच आता घरचा रस्ता दाखवला जात असल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.
चंद्रकांत बाठे यांना डावलल्याने 'आरपार'ची लढाई
राष्ट्रवादीचा आक्रमक आणि निष्ठावंत चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रकांत बाठे यांच्यासह अनेक इच्छुकांना डावलण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा संयम सुटला आहे. पक्षाच्या या निर्णयाचा निषेध म्हणून आणि मतदारांच्या आग्रहाखातर आता 'अपक्ष' निवडणूक लढवनार आहेत.
तर भाजपचे किसनराव सोनवणे याच्या मुलाला भाजपने एनवेळी उमेदवारी नाकारल्याने महादेव सोनवणे यांनी काही मिनिटात शिंदे सेनेत प्रवेश करत सेनेच्या तिकिटावर जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवीत आहेत त्यामुळे भाजपातील कार्यकर्ते आता आमनेसामने उभे ठाकले आहेत.
यामुळे अधिकृत उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

