कापूरहोळ
पुणे जिल्हा प्रशासनाच्या विद्यमाने व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६' ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा दि. २१ जानेवारी २०२६ रोजी पुरंदर,भोर,राजगड तालुक्यातील विविध मार्गांवरून जाणार आहे.यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून अंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पहान्यांची संधी भोर करांना मिळणार आहे.
ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा ४३७ किलोमीटर अंतराची असून ४ टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. स्पर्धेत १७१ आंतरराष्ट्रीय सायकलपटू सहभागी होणार असून या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण वृत्तवाहिन्यांवर केले जाणार आहे.दुसऱ्या टप्प्याचा मार्ग पुणे-बोपदेव घाट-भिवरी - नारायणपूर-कापूरहोळ - कासुर्डी -दीडघर-करंजावणे - कुसगाव - खिंड शिवापूर-डोंजे-पुणे असा आहे.
टप्पा क्र.१
मंगळवारी (ता. २०) पुणे ग्रँड टूरच्या मार्ग मुळशी, मावळ तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातून जाणार असून, डोंगराळ आणि शहरी असा एकत्रित भाग आहे. हिंजवडी फेज-३ येथून दुपारी दीड वाजता सुरू होऊन पौड, नांदगाव, कोळवण, तिकोना पेठ, कडधे, डोणे, कासारसाई, मारुंजी, डांगे चौक आणि आकुर्डीतील डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये संपणार आहे.
टप्पा क्र.२
बुधवारी (ता. २१) दुसऱ्या किलोमीटरची स्पर्धा पुरंदर, राजगड आणि हवेली तालुक्यात होईल. या दिवशी कॅम्पमधील द लेडीज क्लब येथून दुपारी १२.३० वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. पुढे गोळीबार चौक, कोंढवा, येवलेवाडी मार्गे पुरंदर तालुक्यातील भिवीकडे सायकलपटू जातील. त्यानंतर केतकावळे, कापूरहोळ, कासुर्डी गुमा, अंबवणे, निगडे, शिवापूर, कोंढाणपूर मार्गे सिंहगड किल्ल्यावरील घाटातून डोणजे, किरकटवाडी मार्गे नांदेड सिटी येथे दुसरा टप्पा संपेल.
टप्पा क्र.3
गुरुवारी (ता. २२) तिसऱ्या टप्पा पुरंदर आणि बारामती तालुक्यात हा १३७ किलोमीटरचा आहे. सासवडमध्ये स्पर्धेलादुपारी १२.३० वाजता सुरुवात होईल. पुढे सुपे, पानवडी घाट, परिंचे, वाल्हे, नीरा, मुर्टी, मोरगाव, जळगाव कडेपठार, पिंपळी, रुई रस्ता, बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयात संपणार आहे.
टप्पा क्र.४
शुक्रवारचा (ता.२३) चौथा आणि अंतिम ९९ किलोमीटरचा टप्पा पूर्णतः शहरी भागातून जाणार आहे. या टप्प्याला बालेवाडीतील क्रीडा संकुलातून दुपारी १.३० वाजता सुरुवात होईल. स्पर्धेचा मार्ग पाषाणमार्गे एनसीएल चौक, रक्षक चौक, काळेवाडी फाटा, डांगे चौक, संत तुकाराम महाराज पूल, भक्ती-शक्ती चौक, त्रिवेणीनगर, टाटा सर्कल, इंद्रायणी चौक, पीसीएनटीडीए सर्कल, सिल्वरवटी चौक, एम्पायर इस्टेट, तापकीर चौक, पुन्हा काळेवाडी फाटा, विद्यापीठ चौक, एनसीसी मुख्यालय, भेलके चौक, नळस्टॉप, लक्ष्मीनारायण चौक, सेवन लव्ह चौक, टर्फ क्लब, साधू मार्गे वासवानी चौक, साखर संकुल बालगंधर्व रंगमंदिर परिसरात स्पर्धा संपेल. बालगंधर्व चौकात पहिला स्पर्धक हा साधारण दुपारी चारच्या सुमारास पोहोचण्याची शक्यता आहे.

