कापूरहोळ
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेना यांच्यात संयुक्त बैठक नुकतीच पार पडली.पुणे जिल्हा परिषद निवडणुका दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढवण्याच्या दृष्टीने जागावाटपाच्या निकषांवर सखोल चर्चा करण्यात आली. मतदारसंघांची सद्यस्थिती, पक्षांची ताकद, मागील निवडणुकांचे विश्लेषण तसेच स्थानिक राजकीय समीकरणांचा आढावा घेत पुढील रणनिती ठरवण्यात आली.
या महत्त्वपूर्ण बैठकीला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ, राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिवसेनेचे आमदार विजयबापू शिवतारे तसेच आमदार अॅड. राहुल कुल यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता गेली अनेक वर्षा पासून आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपा पूर्ण ताकदीने कामाला लागली असून सोबत शिंदे सेना साथीला आहे.आगामी निवडणूक भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे.
पवारांची पुणे जिल्हा परिषदेसाठी रणनीती "बटेंगे तो कटेंगे " फॉर्मूल्यावर काम सुरु.
बारामतीत शरद पवारांच्या गोविंद बाग निवासस्थानी बैठक पारपडल्याचे समजते या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार आदींची उपस्थिती होती.आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेत कमळ फुलणार की घड्याळाची टिक टिक राहणार हे निवडणूक निकालानंतरच समजेल.

