*पुणे ग्रॅन्ड टूर सायकल रेस तयारी जोमात मोहरी खुर्द येथे रस्त्याच्या दुतर्फा लोक वर्गणी तून वृक्षलागवड*

Rajtorannews
कापूरहोळ 
अंतरराष्ट्रीय ‘पुणे ग्रँड चॅलेंज २०२६ सायकल स्पर्धा पुणेसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून १९ ते २३ जानेवारी २०२६ ला होणार आहे.शासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरु असून ग्रामीण भाग पुढे सरसवला आहे.ग्रामीण स्पर्धेचा मार्ग मोहरी तालुका भोर गावातून जात आहे, मोहरी ग्रामपंचायतीच्या हद्दी मध्ये रस्त्याच्या दुतर्फा फळ वृक्षलागवड करण्यात आली असून दुतर्फा वृक्ष लागवडीमुळे रस्त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे,
ग्रामस्थांनि लोकवर्गणीतून दुतर्फा वृक्षलागवड केली आहे.यावेळी रस्त्याच्या दुतर्फा ११११ वृक्षांची लागवड करण्यात आली,या कार्यक्रमा प्रसंगी भोर चे तहसीलदार राजेंद्र नजन,मंडल अधिकारी मनोज ढवळे,तलाठी हिमाणी चोपडे,ग्रामसेवक खुडे,शिक्षक नितीन कांबळे,पोलिस पाटील गोरक्षनाथ सुतार,गावचे माजी सरपंच सागर पांगारकर,उपसरपंच मनिषा पांगारकर आदी उपस्थित होते.झाडाचे महत्त्व सांगणारे फलक या ठिकाणी लावण्यात येणार आहेत अशी माहिती प्रथमेश पांगारकर यांनी दिली,
या कार्यक्रमाचे आयोजन मराठा ग्रुप चे वतीने करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष आकाश पांगारकर,सदस्य प्रवीण पांगारकर,सचिन पांगारकर,विशाल पांगारकर,तेजस पांगारकर,ऋतिक पांगारकर,प्रतीक पांगारकर,वैभव पांगारकर,संग्राम पांगारकर,भरत पांगारकर,प्रणव पांगारकर,परशूराम जांभळे,अविनाश जांभळे,पांडुरंग देवघरे सह सर्व सदस्य उपस्थित होते.
To Top