कापूरहोळ
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. इच्छुक उमेदवारांनी जोरदार प्रचार करत मोर्चे बांधनी केली आहे. परंतु पक्षाचे तिकीट मिळण्याची खात्री नसल्याने उमेव्दार धास्तावलेले आहेत. वरीष्ठ पातळीवरील नेत्यांची सतत बदलती विचार धारामुळे प्रत्येक कार्यकर्ता संभ्रमात आहे. राजकीय पक्षांची मुळ विचार धारा जवळ जवळ संपुष्टात आली आहे. पक्षांच्या वेळोवेळी बदलत्या भूमीका ही पक्षाची विचार धारा संपवत आहेत. सत्तेच्या खुर्चीसाटी कोणत्याही पातळीवर जावून सत्ता मिळवण या उददेशाने पक्ष भारावले आहेत. धनशक्तीच्या वाढत्या प्रकोपामुळे मत विकत घेण्यामागे पक्षांचा कल वाढल्याने आर्थीकदृष्ट्या कमकुवत कार्यकरते लोकशाहीच्या प्रवाहातून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहेत. पक्षाच्या सत्तामिळवण्याच्या हव्यासापोटी पैशाच्या बळावर आकसम्मित पुढे येणारे उमेव्दार आर्थीक तसेच विविध प्रलोभणे दाखवुन मतदारांना आकर्षिक करण्यात यशस्वी ठरताना दिसत आहेत. उमेव्दारी देताना पक्षश्रेष्ठी पैसा किती खर्च करणार याचे आर्थीक आराखडे बांधत असल्याने पक्षाचा आर्थीक दृष्ट्या कमकुवत मुळ कार्यकर्ता मागे पडू लागला आहे. त्यामुळे लोकशाही ही भांडवल वादाकडे झुकत आहे. धनदांडग्यांनी उमेच्दारीसाठी दंड थोपटले असून मतदारांना साडी वाटप, तिर्थयात्रा,निसर्ग पर्यटन आणि मतदानाआधी या ना त्या मार्गान रोख रक्कम पुरवून मतदान जवळजवळ खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. लोकशाही टिकवण्याची जबाबदारी आता ख-या अर्थाने मतदारांवर येवून ठेपली आहे. निवडणुकीतील भांडवल वाद संपवण्यासाठी मतदारांनी खरा जनतेचा सेवक कोण याची पारख करून सदसद विवेक बुध्दीने मतदान करणे गरजेचे आहे. आर्थीक लोभाला बळी पडून मतदान केल्यास निवडून आलेले भांडवलवादी लोकशाहीचा गळा घोटून भांडवलशाहीकडे झुकतील आणी केलेला खर्च दुपटीने वसुल करण्यासाठी भ्रष्टाचाराला खतपाणी घालतील यात शंकाच नाही.असे जानकरांचे मत आहे.

