भोर कापूरहोळ मार्गांवर भीषण अपघात आई मुलाचा दुर्दैवी मृत्यू., तेलवडी गावावर शोककळा

Rajtorannews

भोर कापूरहोळ मार्गांवर कासुर्डी गु. मा. तालुका भोर हद्दीत भर धाव कारने रस्त्याच्या साईडपट्टीवर उभ्या असलेले मोटर सायकल सह दोघांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात माय-लेकरा चा जागीच मृत्यू झाला असून, कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.अपघाता नंतर स्थानिकांनी कार मधील चार पैकी दोन जन पोलिसांच्या ताब्यात दिले असून दोन जण फरार झाले आहेत. 

अपघात स्थळी मिळालेल्या माहिती नुसार दिनांक 31 रोजी दुपारी एक च्या सुमारास ही घटना घडली आहे.भोर बाजू कडून पुणे च्या दिशेने चाललेली कार गाडी नंबर एम एच 12 व्ही एन 0101 ही भरधाव वेगात होती. रस्त्याच्या बाजूला शेतात जाण्यासाठी उभे असलेल्या अमृत लक्ष्मण धावले वय 27 व नंदा लक्ष्मण धावले वय 55 (दोघेही रा. तेलवडी, ता. भोर) यांना जोरदार धडक दिली अपघात एवढा भीषण होता कि कार मधील पुढील बाजूच्या दोन्ही एअर बॅग ओपन झाल्या होत्या अपघातात दुचाकी दुरवर गटारात फेकली गेली तर उभे असलेली दोघांना जबर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक हा पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. कारची तपासणी केली असता, गाडीमध्ये दारूच्या बाटल्या, पाण्याचे ग्लास आणि शेंगदाणे आढळून आले आहेत. यावरून मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

        स्थानिकांनी जखमी माय-लेकांना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. एकाच कुटुंबातील दोघांचा अशा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तेलवडी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

     घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले असून,  'ड्रंक अँड ड्राईव्ह'मुळे दोन निष्पाप जीवांचा नाहक बळी गेल्याने आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
To Top