भोर नगरपरिषदेचा पाच फेऱ्यांत निकाल

Rajtorannews
कापूरहोळ

भोर नगरपालिका निवडणूक निकालाकडे संपुर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले असून नागरिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांच्यात अत्यंत चूर्षीची आणि दोन्ही पक्षासाठी प्रतिषठेची आहे. सदर निवडणुकीची मतमोजणी कान्होजी जेधे शासकीय प्रशिक्षण संस्था, (आयटीआय)भोर येथे रविवार (दि.२१) रोजी सकाळी दहा वाजता सुरु होणार असुन मतमोजणी पाच फेरीत पूर्ण होणार असल्याचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितले.

रविवार सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलला चार कर्मचारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून दोन जण उपस्थित असणार आहेत. पहिल्या फेरीमध्ये एक ते पाच प्रभागमधील अ क्रमांकाची मतमोजणी, दुसऱ्या फेरीत प्रभाग क्रमांक एक ते पाच मधील ब क्रमांकाची मतमोजणी, तिसऱ्या फेरीत प्रभाग क्रमांक सहा, सात, आठ व दहा अ क्रमांकाची व प्रभाग चार मधील क नंबरची मतमोजणी होणार आहे. चौथ्या फेरीत प्रभाग क्रमांक सहा, सात, आठ, दहा ब ची आणि प्रभाग क्रमांक नऊ मधील अ ची मतमोजणी होणार आहे. पाचव्या फेरीत प्रभाग क्रमांक आठ क आणि प्रभाग क्रमांक नऊ ब ची मतमोजणी होणार आहे. सर्व पाचही फेऱ्यांची मतमोजणी झाल्यानंतर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा निकाल जाहीर होणार आहे.

एकूण १६ हजार ७१६ पैकी १२ हजार ८६५ मतदान झाले आहे.मतमोजणीनंतर साधारणतः एक ते दीड तासात निकाल लागेल असे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितले.
To Top