नसरापूर ता भोर येथील प्रसिद्ध निसर्ग कवी लक्ष्मण शिंदे यांच्या 'हिरव्या वाटा' या कवितासंग्रहाला फलटण येथील साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय 'माणगंगा साहित्यप्रेमी गौरव' पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
स्वराज्य कॅरिअर अकॅडमी, दहिवडी तालुका मान येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे जिल्हा प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, ज्येष्ठ साहित्यिक व रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (उच्च शिक्षण) शिवलिंग मेनकुदळे, ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र येवले, अनिल धाडस यांच्या हस्ते राज्यातील १९ साहित्यिकांच्या पुस्तकांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. साहित्य संमेलनाचे नियोजन व संयोजन ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध आणि आनंदी वातावरणात यशस्वीपणे पार पडला.
'हिरव्या वाटा' या कवितासंग्रहाला मिळालेला हा सन्मान लेखकाच्या साहित्यिक प्रवासातील महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.

