डंपर घरावर उलटला, एक ठार तीन जखमी कुरुंगवडी येथील दुर्दैवी घटना

Rajtorannews

 


कापूरहोळ

कुरूंगवडी तालुका भोर येथील गावचे हदिदत पत्र्याचा वाडा धनगरवस्ती येथे घराच्या बांधकामासाठी आणलेली क्रश सॅण्ड डंपर ट्रॉलीमधून घराच्या समोर खाली करत असताना हायड्रॉलिकने उचललेल्या ट्रॉलीचा तोल जाऊन ट्रॉली डंपरसह शेजारील पत्र्याच्या घरावर कोसळून घरामधील मुलांसह त्यांची आई क्रश सॅण्ड खाली गाडले गेले. या दुर्घटनेत आईसह दोन मुलांना वाचविण्यात यश आले; मात्र एक पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. धोंडीबा रामभाउ कचरे यांनी राजगड पोलिस ठाण्यात डंपरचालका विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

आलोक अशोक कचरे (वय ५) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर त्याची आई आरती अशोक कचरे (वय ३५), प्रियांका जगन्नाथ कचरे (वय १७), श्लोक अशोक कचरे (वय ६) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. डंपर चालक अमरजीत राजभर याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.अधिकचा तपास राजगड पोलीस करीत आहेत.


To Top