भोंगवली - कामथडी गटात तुतारीचा आवाज दुमदूमणार
गटात मोठी राजकीय उलथा पालथ
कापूरहोळ
कामथडी भोंगवली जिल्हा परिषद गटातून येणाऱ्या निवडणुकीत वैभव धाडवे पाटील यांनी हाती तुतारी घेत रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. वैभव धाडवे पाटील हे गेली अनेक वर्षे शैक्षणिक, सामाजिक, सहकार, कृषी, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रमांद्वारे समाजसेवा करत आहेत. विशेषतः 'शूरवीर मावळी संघटना' या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकहिताचे उपक्रम राबवले असून, जनतेच्या मनात आपलेपणाची छाप निर्माण केली आहे. पत्रकारिता क्षेत्रातही त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ प्रभावीपणे काम केले आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेच्या अडचणी यांचा त्यांनी सदैव पाठपुरावा केला आहे. त्यामुळे ते फक्त पत्रकार म्हणून नव्हे तर जनतेचा एक प्रतिनिधी म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.
धाडवे पाटील यांचा ठाम विश्वास आहे की, "जनतेची सेवा आणि गोरगरिबांच्या प्रश्नांवर उपाय शोधणे हेच ध्येय आहे." स्थानिक जनतेत त्यांचा प्रभाव, त्यांच्यावरील विश्वास आणि निःस्वार्थ कामामुळे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )गटाची संपूर्ण ताकद उमेदवार म्हणून धाडवे यांचे पाठीशी उभी आहे.त्यामुळे विजयश्री निश्चित खेचून आणणार अशी जनमानसात जोरदार चर्चा सध्या रंगत आहे.
आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनीही सर्व पातळीवर तयारी सुरू केली आहे. "जनतेचा आशीर्वाद आणि सेवाभाव हेच माझे खरे बळ आहे," असे सांगत वैभव धाडवे पाटील यांनी राजकीय क्षेत्रात आपली दमदार एन्ट्री केळी आहे.
(वैभव धाडवे पाटील बोलताना म्हणाले की, मी शरद पवार साहेब यांचे विचारांना मानणारा आहे.मला शासकीय व प्रशासकीय कामकाजांचा अनुभव आहे त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला निश्चितच होणार आहे. शरद पवार साहेब खासदार सुप्रियाताई आणि वरिष्ठ नेते माझ्यापाठीशी खंबीर पणे उभे आहेत त्यामुळे ही निवडणूक सोपी जाणार असून तुतारी पुणे जिल्हा परिषदेत वाजल्या शिवाय राहणार नाही.)


