कापूरहोळ वार्ताहर
वेळू नसरापूर जिल्हा परिषद गटातून येणाऱ्या निवडणुकीत उत्तम बबनराव कोंढाळकर यांनी निवडणूक लढण्याचा आपला ठाम निर्धार व्यक्त केला आहे. "पक्षाची चाचपणी सुरू आहे, मात्र वेळ पडल्यास मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार," असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
उत्तम बबनराव कोंढाळकर यांनी गेली अनेक वर्षे दूध व्यवसायाच्या माध्यमातून गटातील गावातून आपला दांडगा जनसंपर्क ठेवला आहे.शैक्षणिक, सामाजिक, सहकार, कृषी, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात लोकहिताचे विविध उपक्रम राबवले असून गेली ३५ वर्षे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांशी जोडलेले आहेत.ग्रामीण भागातील समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेच्या लहान मोठया अडचणी यांचा त्यांनी सतत पाठपुरावा केला आहे.कांबरेश्वर तरुण मंडळाच्या स्थापनेपासून गेली ४५ वर्षे तरुण युवकांच्या विविध प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम करत आहेत.त्यामुळे तरुण युवकात आणि जनतेच्या मनात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. येऊ घातलेल्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा परिषद उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी असा तरुण युवकांचा आग्रह आहे.असे त्यांनी सांगितले
"वेळू नसरापूर गटातील विविध समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असून जनतेची सेवा आणि गोरगरिबांच्या प्रश्नांना वाचा फोडून अन्याय दूर करणे हे ध्येय बाळगून सर्वाना सोबत घेऊन कामकरणार आहे. निःस्वार्थ कामामुळे वेळ प्रसंगी अपक्ष उमेदवार म्हणूनही जनमानसात मजबूत पाठबळ मिळु शकते अशी खात्री आहे. आगामी निवडणुकीसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
कोंढाळकर बोलताना म्हणाले की, भागातील शेतकऱ्यांना दूध व्यवसाय उभारणीस सर्वोपरी मदत करत असून दुधाला जास्तीत जास्त दर मिळावा म्हणून सतत प्रयत्नशील आहे.मला जनतेतील कामाचा आणि राजकीय नेत्यांच्या एनवेळच्या डावपेचाचा चांगलाच अनुभव आहे, त्यामुळे या निवडणूकित आपला विजय निश्चित आहे , राजकीय पक्षाची ताकद मिळाली नाही तर, अपक्ष निवडणूक लढणारच