शेतक-याचा मुलगा झाला सीए

Rajtorannews

 केंजळच्या सोहम बाठेचे सीए परीक्षेत यश

कापूरहोळ 

केंजळ ता. भोर येथील शेतकरी कुटूंबातील सोहम बाठे याने सीए परीक्षेत यश संपादन केले. सोहम ची आई वैशाली बाठे व वडील प्रशांत बाठे हे दोघेही शेतकरी आहेत. सोहम चे सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परीषद शाळा केंजळ येथे झाले तर पुढील १० वी पर्यंतचे शिक्षण ज्ञानसंवर्धिनी विदयालय शिरवळ ता. खंडाळा येथे तर ११ पासून पदवी पर्यंतचे शिक्षण मॉडर्न कॉलेज पुणे येथे झाले. पहिल्याच प्रयत्नात वयाच्या २३ व्या वर्षी सीए अंतीम परीक्षा सोहम उत्तीर्ण झाल्याने  त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांनी विशेष अभिनंदन केले.

To Top