जिल्हा परिषद शाळांमध्ये विदयार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
कापूरहोळ वार्ताहर
पुणे जिल्हयात ग्रामीण भागातील शाळा सोमवार दि.१६ रोजी नियमीत मुरू झाल्या आणि दिडमहीन्यानंतर शाळेच्या पांगणात चिमुकल्यांचा किलबिलाट सुरु झला ग्रामीन भागातील विदयार्थी पालक आणि शिक्षकांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवसाचा उत्साह दिसून आला पुणे जिल्हयातील भोर तालुक्यातील संगमनेर (माळवाडी) जिल्हा परिषद शाळेत विदयाथ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
विदयार्थ्यांची वाजतगाजत प्रभात फेरी काढण्यात आली तसेच शाळेच्या प्रवेशव्दारावर फुगे आणि आकर्षक रांगोळी काढून फुलांची सजावट केली होती. शाळेच्या उपशिक्षिका शमीम शेख यांनी विदयार्थ्याचे औक्षण करून फुगे व गुलाब पुष्प देवून फेटे बांधून विद्यार्थ्यांनचे स्वागत केले यावेळी मुलाना शालेय गणवेश , पाठ्यपुस्तके वाटप करून मिठाई देण्यात आली. त्यामुळे मुलांच्या चेह-यावर आगळा वेगळा आनंद दिसत होता. शाळेने केलेल्या या स्वागतामुळे विदयार्थी व पालक भारावून गेले होते. यावेळी पालक आणि विदयार्थ्यांचे हस्ते शाळेच्या आवारात पामवृक्षाची लागवड करण्यात आली.या प्रसंगी शाळेतील शिक्षक विदयार्थ्यांचे पालक , सरपंच , ग्रामस्थ उपस्थित होते .
" मुलांना शाळेबददल आवड निर्माण होवून मुलांच्या मनात असणारी शाळेबददलची भिती दूर होवून शाळेबददल आपुलकी निर्माण होण्यास मदत होईल असे मत शाळेच्या मुख्याध्यापीका प्रतिभा खुटवड यांनी यावेळी व्यक्त केले."