कापूरहोळ वार्ताहर
कारागृह पोलीस कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली त्यात स्वराज्य पॅनल चे सर्व उमेदवार संचालक म्हणून निवडून आले परंतु अत्यंत महत्वाची आणि जबाबदारीची पदे चेअरमन व सचिव ही कोणाला मिळतील याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. संस्थेच्या चेअरमन पदी वसीम इनामदार तर सचिव पदी मनोज गायकवाड तसेच व्हा.चेअरमन पदी अतुल पटेकर यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. त्यातील मनोज हनुमंत गायकवाड हे भोर तालुक्यातील संगमनेर गावचे सुपुत्र आहेत त्यांची कारागृह पोलीस म्हणून 2018 मध्ये निवड झाली आहे . काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत त्यांना महाराष्ट्रातून नंबर एक चे मतदान मिळून ते सर्वात तरुण उमेदवार ठरले होते. आज त्यांची सचिव पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यावेळी निवडणूक अधिकारी अमर देशपांडे , चेअरमन वसीम इनामदार,व्हा चेअरमन अतुल पटेकर, संचालक प्रमोद इंगळे ,योगेश पाटील,प्रमोद जानराव,दौलत खिलारे, भरत बंडगर,साहेबराव वाळकुळे, प्रणाली कोकाटे,लीला धुमाळ संस्थेचे कर्मचारी लिपिक प्रिया शिर्के व स्वाती बडेकर हवा.दळवी , महिला पोलिस कर्मचारी दीपाली गोफणी आदी संस्थेचे सभासद उपस्थित होते