स्वराज पॅनल दणदणीत विजयी
सर्वात तरुण सदस्य म्हणून संगमनेर तालुका भोर चे मनोज गायकवाड
कारागृह अधिकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूक 2025 च्या निवडणुकीत स्वराज पॅनल ने दणदणीत विजय मिळवून आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
स्वराज्य पॅनल चे मनोज गायकवाड,वसीम इनामदार ,अतुल पटेकर,प्रमोद इंगळे,प्रमोद जानराव,योगेश पाटील,दौलत खिलारे, भरत बंडगर हे उमेदवार कपबशी चिन्हावर निवडून आले तर महिला राखीव मधून प्रणाली कोकाटे, लीला धुमाळ यांची तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात साहेबराव वाळकुळे यांची संचालक पदी निवड झाली आहे.
या निवडणुकीत सर्वात तरुण उमेदवार म्हणून संगमनेर तालुका भोर चे मनोज गायकवाड यांना एकूण मताच्या 84% मते मिळाली असून महाराष्ट्रातून एक नंबर चे मतांनी ते निवडून आले.
या निवडणुकीत विद्यमान चेअरमन बाजीराव पाटील यांचे पॅनल चा दारुण पराभव झाला आहे. अमर देशपांडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले .
मनोज गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की ,ही निवडणूक इतर राजकीय स्वरूपाची नसून आम्ही मैत्रीपूर्ण निवडणूक लढलो आहोत. आमचे सर्व उमेदवार हे येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे कर्तव्यावर आहेत. आमची पतसंस्था अजून पुढे नेण्यासाठी पुढाकार घेतला आहे विद्यमान चेअरमन बाजीराव पाटील यांनी उत्तम कार्यभार सांभाळला आहे. ते गेली १० वर्षे संचालक म्हणून काम पाहत असून एक वर्षापासून चेअरमन आहेत. व्हा. चेअरमन रवींद्र सावंत व सचिव अमर पाटील यांनी निवडून आलेल्या स्वराज्य पॅनल चे उमेदवार यांना शुभेच्या दिल्या आहेत. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नसून . आम्ही सर्वजण DIG मॅडम स्वाती साठे, अधीक्षक सुनील ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम ड्युटीकर्तव्य बजावत संस्थेचे कामकाज पाहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.