कापूरहोळ
पुणे-सातारा महामार्गावरील कामथडी (ता. भोर) गावातील खुटवडवस्ती येथे पाण्याची मोटर चालू करताना विजेचा धक्का लागून ३६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 14 रोजी घडली. राजेंद्र चंद्रकांत खुटवड असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अशोक ज्ञानोबा खुटवड यांनी राजगड पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नुसार दिनांक 14/05/2025 रोजी दुपारी 02:40 वा.चे. सुमारास राजेंद्र चंद्रकांत खुटवड, वय 36 वर्षे, रा. खुटवड वस्ती, कामथडी, ता. भोर, जि. पुणे हे त्याचे घराचे समोर पाण्याची मोटार चालु करणेसाठी गेले असता विजेचा जोरदार झटका लागुन ते जागीच बेशुध्द पडले. गांवातील ग्रामस्थ गणेश चंद्रकांत खुटवड, कोमल राजेंद्र खुटवड यांनी त्यांना ताबडतोब नसरापूर येथे खाजगी रुग्णालयात उपराचासाठी नेहले असता उपचार चालु असताना दुपारी 3.00 वाजता त्यांचा मृत्यू झाला.सदर घटनेबाबत अधिकचा तपास राजगड पोलीस करत आहेत.