कापूरहोळ
भोर तालुक्यातील भाजप अध्यक्ष पदांसाठी फेर बदल करताना तालुक्यात उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग केले असून भोर तालुका भाजप उत्तर अध्यक्षपदी संतोष रामचंद्र धावले, आणि दक्षिण अध्यक्षपदी रवींद्र धोंडिबा कंक, तर भोर शहर अध्यक्षपदी पल्लवी प्रमोद फडणवीस यांची निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक माउली चौरे, गिरीश जगताप यांनी ही निवड जाहीर केली.
कापुरव्होळ (ता. भोर) येथे भोर तालुका व भोर शहर भाजप अध्यक्ष निवड बैठक पार पडली. यावेळी भाजप उपजिल्हाध्यक्ष बाळासाहेब गरूड, जीवन कोंडे, विश्वास ननावरे, राजेंद्र गुरव, सचिन मांडके, मारुती धोंडे, समीर घोडेकर, दत्तात्रय झांजले आदी उपस्थित होते.