राज्यस्तरीय संताजी धनाजी पुरस्कार 2025 ने बापू कुडले सन्मानित

Rajtorannews

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल पुरस्कार


कापूरहोळ वार्ताहर 

प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संस्था यांच्यावतीने राज्यस्तरीय संताजी धनाजी पुरस्कार 2025 सोहळा कराड येथे संपन्न झाला. या विभागीय मेळाव्यात पुणे, सातारा ,सांगली ,कोल्हापूर , सोलापूर  या जिल्ह्यातून उत्कृष्ट कामगिरी बद्दल भोर तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बापू कुडले यांना सन्मानपत्र ,सन्मान चिन्ह व वृक्ष भेट देऊन  माजी राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.कराड येथे दिनांक 13 मे रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.गेल्या 8 वर्षा पासून बापू कुडले यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना यावेळी गौरविण्यात आले. 
        सदर कार्यक्रम प्रसंगी भोर तालुका प्रहार संघटनेच्या महिला अध्यक्ष मनीषाताई गायकवाड ,सचिव शांताराम खाटपे, संपर्कप्रमुख भानुदास दुधाने ,कार्याध्यक्ष राणीताई शिंदे, सदस्य सुनिता कंक, सुरेश कोंडे , शंकर खोंडगे, अनिल दळवी , तुकाराम गोळे ,  धोंडीबा कुडले , विद्या कुडले  आदी उपस्थित होते. 

       " या प्रसंगी बोलताना अध्यक्ष  बापू कुडले म्हणाले कि हा पुरस्कार भोर तालुक्याला पहिल्यांदा मिळाला असून हा गौरव माझा वैयक्तिक नसून सामूहिक आहे. ज्याचे भागीदार माझे कुटुंब, संघटनेचे सर्व सहकारी , सर्व दिव्यांग बंधू भगिनी हे आहेत. यामुळे मला कामकरताना सतत प्रेरणा मिळत राहील."
To Top