देवाच्या मुखवट्यावर चोरट्यांचा डल्ला

Rajtorannews


बालसिद्धनाथ देवाच्या चांदीच्या मुखवट्यावर चोरट्यांचा डल्ला

भोर तालुक्यातील नेरेतील घटना  

भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भोर  
विसगाव खोऱ्यातील नेरे (ता. भोर) येथी ग्रामदैवत बालसिद्धनाथ देवाचा चांदीचा मुखवटा गाभाऱ्यातून चोरीला गेल्याचे  निदर्शनास आले आहे.मुखवट्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना रविवारी (दि. २० एप्रिल) रात्री घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत भोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याघटने बाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दिनांक २० रोजी रात्री देवाचा अर्धा किलो वजनाचा चांदीचा मुगुट घाबऱ्यातच होता. सोमवारी दिनांक  २१रोजी सकाळी मंदिर साफसफाई तसेच देवाची पूजा करण्यास काही ग्रामस्थ गेले असता ग्रामदैवत बालसिद्धनाथ देवाचा चांदीचा मुखवटा गाभाऱ्यातून चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.या मुखवट्याची अंदाजे किंमत ४० ते ५० हजार रुपये असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यानंतर तात्काळ नेरे (ता. भोर) येथील स्थानिक नागरिकांनी भोर पोलिसांना माहिती दिली.  भोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक आण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  तपास सुरू आहे.

To Top