Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार दि. ८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. निकालाच्या घोषणेमुळे राज्यभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा राज्यातील सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, लातूर, अमरावती आणि कोकण विभागीय मंडळांमधून परीक्षा पार पडली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निकाल आठ दिवस आधी जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी दिलासा मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना आपला निकाल सीट नंबर आणि आईचे नाव टाकून अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिका छायांकित प्रत तसेच पुनर्मूल्यांकन प्रक्रियाही सुरू होणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
निकाल पहाण्यासाठी
Maharashtra Board Result Portal
किंवा SSC Result Website
वर जाऊन Seat Number टाका —उदा C094086आईचे पहिले नाव टाका
“View Result” वर क्लिक करा

