विकासाच्या गोंडस नावाने जनतेची फसवणूक? भोंगवली–कामथडी गटात मतदार गरम!

Rajtorannews
कापूरहोळ 

भोंगवली–कामथडी जिल्हा परिषद गटामध्ये काही उमेदवारांना मतदारांनी प्रचार सुरू होण्यापूर्वीच साफ नकार दिल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. वर्षानुवर्षे विकासाच्या गोंडस नावावर केवळ घोषणा, आश्वासने आणि दिखावा करणाऱ्या प्रतिनिधींविरोधात नागरिकांचा रोष आता उफाळून आला आहे.
रस्ते, पाणी पुरवठा, वीज, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर गेली चाळीस वर्षे ठराविक सत्ताधारी सत्ता उपभोगत आहेत. प्रस्थापितांनी समाधान कारक कामे केली नाहीत. निवडणूक आली की मतदारांची आठवण होते, उदघाटन करून कामे पूर्ण होत नाहीत अशी तीव्र भावना स्थानिक नागरिकांमध्ये आहे. अपूर्ण कामे, रखडलेले प्रकल्प, रस्त्यांची दुरावस्था यामुळे उमेदवारांबाबत मतदार तीव्र नाराजी व्यक्त करत आहे.

“निवडणुकीपुरते बोहल्यावर , बाकी काळात जनता वाऱ्यावर,” अशा शब्दांत मतदार संताप व्यक्त करत आहेत. जनतेच्या विश्वासाचा बाजार मांडणाऱ्या आणि स्वार्थी राजकारण करणाऱ्या उमेदवारांना यावेळी भोंगवली–कामथडी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती निवडणुकीत मतदारांनी ठामपणे धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे.अशी चर्चा सर्वत्र चालू आहे.
To Top